Home

Home Paralax

Computer Master

Learn Computer Online

Learn computer in local language , from starter to advance level computer lessons.

Online Courses

Computer Master
100 videos covering all the basic aspects of computers and internet

Computer Master +
100 basic videos + 100 additional intermediate level videos covering higher topics of computers and internet skills.

Computer Master ++
Total 360 videos covering basic to advance level videos covering basic to advance level topics of computers and internet skills.

About

New India Is Digital India !!

www.computermaster.org ही वेबसाईट आपल्या समोर सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. तंत्रज्ञान वापरणे हे आता सर्वांनाच अपरिहार्य झालेले आहे. परंतु मुळात ह्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर आपणास इंग्रजी भाषेतून करावा लागतो. आणि ते वापरण्या संदर्भातील सर्व माहिती व ज्ञान हे सुद्धा इंग्रजीतूनच उपलब्ध आहे. नाही म्हणायला काही मराठी मित्र ह्या विषयावरील माहिती मराठीत देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचे हे प्रयत्न काही मर्यादित लोकांपर्यंतच पोहोचले आहेत. आणि दुसरी गोष्ट तंत्रज्ञान हे अत्यंत वेगाने बदलत आहे. तसेच नवीन नवीन रूपे घेत आहे. तंत्रज्ञानाची ही नवी रूपे समजून घेणे. त्यातील खाचखळगे माहिती करून घेऊन सुरक्षित पणे त्याचा वापर करणे आवश्यक आहे.
या वेबसाईटवरील लेख मराठीत लिहित असताना तसेच व्हिडिओ बनवत असताना, ज्या इंग्रजी शब्दांना रुळलेला मराठी पर्याय उपलब्ध नाही त्या ठिकाणी ओढून ताणून एखादया किचकट किंवा समजण्यासाठी अवघड शब्दाचा पर्याय देण्याचा अट्टाहास इथे करण्यात आलेला नाही. त्यापेक्षा रुळलेले व ओळखीचे इंग्रजी शब्द तसेच ठेवून तंत्रज्ञान साध्या सोप्या मराठी भाषेत शिकवण्यात आले आहे.
तंत्रज्ञानाचा नेहमीचा सर्वसाधारण वापराशिवाय काहीतरी खास आणि वेगळे या वेबसाईटवर दिल्याने ही वेबसाईट चाकोरीतली नाही हे लक्षात घ्यावे. पण ही वेबसाईट काही विशीष्ट जाणकारांसाठी किंवा तज्ञांसाठी मर्यादित आहे असेही नाही, तर तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या सर्वांसाठी आहे. यात तंत्रज्ञानाचे बेसिक जाणणाऱ्या व्यक्ती पासून ते एक्स्पर्ट तज्ञा पर्यंत सर्वांसाठी काही ना काही आहे.
या वेबसाईट वरील काही निवडक ट्रिक्स आणि टिप्सची खास एक ‘सीडी’ तयार करण्यात आलेली आहे. या सीडी च्या माध्यमातून तुम्हाला इंटरनेट शिवाय सुद्धा या ट्रिक्स आणि टिप्स वापरून पाहता येतील. सीडी पाहिजे असल्यास या वेबसाईट वरील सीडी च्या जाहिरातीवर क्लिक करा व पुढील सूचना काळजीपूर्वक वाचा.
ही वेबसाईट हाताळण्या अगोदर या वेबसाईटच्या नियम व अटी वाचणे आपणास बंधनकारक आहे. आणि ह्या नियम व अटींच्या अधीन राहूनच या वेबसाईटवरील साहित्याचा आपणांस वापर करता येईल.
अनेक विचार, कल्पना आणि एक समाधान मनात घोळवत ही वेबसाईट आपल्यासमोर ठेवत आहे. तुमचा अभिप्राय तुमच्या सूचना आम्हाला नक्कीच पुढच्या वाटचालीत मार्गदर्शक ठरतील. ह्या वेबसाईटवर तंत्रज्ञानाचा एक कोपराच फक्त दाखवला आहे याची आम्हाला कल्पना आहे. त्याचे इतर कोपरे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही पुढे वेळोवेळी करत राहू. वाचकहो आमच्या वेबसाईटला तुमचे प्रेम लाभावे हे आमचे आणि आमच्या वेबसाईटचे भाग्य समजतो. माझ्या या मराठी प्रयत्नांना पुढेही अशीच साथ लाभो ही विनम्र प्रार्थना.
तुमचा आवडता मित्र
कॉम्पुटर मास्टर